नवोदित कविमहोदयांनी शासकीय योजना माहिती प्रचार व प्रसार विषय संदर्भ घेऊन कविलेखन करावे - आमदार अशोक बापु पवार

नवोदित कविमहोदयांनी शासकीय योजना माहिती प्रचार व प्रसार विषय संदर्भ घेऊन कविलेखन करावे -  आमदार अशोक बापु पवार

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य व भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा उद्घाटन प्रसंगी राज्यातुन आलेल्या कवि महोदयांनी उत्तम प्रकारे साहित्य कविलेखन करत असताना आपल्या काव्यलेखनातुन शासकीय योजनांचा प्रचार प्रसार ग्रामीण व शहरी लोकांपर्यंत शासकीय विषय संदर्भातील कवितालेखन कवि महोदयांनी करावे असे मनोगत राज्यस्तरीय कविसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख ॲड.अशोक बापु पवार आमदार शिरुर हवेली यांनी आपले विचार मनोगत व्यक्त केले.

    या संमेलनामध्ये आलेल्या राज्यस्तरीय कविंनी साहित्य कविलेखन आपले विचार काव्य रसिकता लेखन करताना आपले विचार,भावना,अप्रतिम लेखन काव्य नवोदित कविंनी अभ्यासपुर्वक करावे याबाबत आपले अनुभव आणि सखोल मार्गदर्शन कवि संमेलन अध्यक्ष बबन पोतदार ग्रामीण कथाकथनकार साहित्य लेखक यांनी कवि रसिकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे हनुमंत चांदगुडे पाठ्यपुस्तक कवि चारुता प्रभुदेसाई, रंगनाथ आप्पा साहेब कड संस्थापक सचिव पु.मा.विद्यालय सोरतापवाडी, दत्तात्रय चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर,माणिक देवकर शिक्षणअधिकारी मनपा पुणे मुख्याध्यापक एम.डी.जाधव सर, विजय तुपे,अमोल भोसले पत्रकार दै.केसरी,प्रा.दिनेश पवार निवेदक प्रवक्ता, महादेव दुरुंगुळे उद्योजक,नरेश मानकरे झेडप्लस मेडिकल,सुनिल तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय कविसंमेलनास एकुण 75 कविंनी कविता सादर केल्या. तर कार्यक्रमास 150 ते 200 कवि प्रेक्षक रसिक उपस्थित राहिले. कवि संमेलनाचे संयोजन सचिन सावंत,प्रतिमा शिंदे,वंदना ढोले,शुभांगी रानवडे,विशाल शिरसट,योगेश हरणे यांचे संयोजक म्हणुन सहकार्य लाभले.

   सदर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष व आयोजक प्रा.सुरेश वाळेकर संस्थापक अध्यक्ष पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य यांनी प्रस्ताविक मनोगत केले. कवि संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार सर तसेच हभप.शुभांगी जाधव यांनी केले तर आभार प्रा. दिनेश पवार यानी मानले.