अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघातर्फे काश्मीर येथील दुर्गम भागातील जनतेसाठी 2 लाख 50 हजार रुपये किंमतींच्या 50000 औषधांच्या पाकीटांचे बाँक्स जम्मु काश्मीर ला रवाना करण्यात आले

अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघातर्फे  काश्मीर येथील दुर्गम भागातील जनतेसाठी 2 लाख 50 हजार रुपये किंमतींच्या 50000 औषधांच्या पाकीटांचे बाँक्स जम्मु काश्मीर ला रवाना करण्यात आले

 इनरव्हिल क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने

काश्मीर येथील दुर्गम भागातील जनतेच्या वैद्यकीय तपासणी साठीनँशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन व इनरव्हिल क्लब ऑफ पिंपरी  यांच्या माध्यमातून 20 तज्ञ डॉक्टरांचे पथक काश्मीर कडे रवाना झाले असून दि‌.18 एप्रिल व दि.23 एप्रिल रोजी वरील वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे

या शिबिरा अंतर्गत भारतीय लष्कराच्या मार्गदर्शन व संरक्षणाखाली काश्मीर खोऱ्यातील दुर्गम भागात निवास करत असलेल्या काश्मीरी लोकांची मेडिकल तपासणी करून त्यांना आवश्यक ती औषधे दिली जातील अशी माहिती या वेळी अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ अध्यक्ष श्री राजेन्द्र शाह व इनरव्हिल क्लब ऑफ पिंपरी च्या अध्यक्षा व महिला सक्षमीकरण समीती सदस्या सौ.निलम मेहता यांनी दिली अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ वैद्यकीय समीती प्रमुख श्री सुशिल भाई शाह व सह प्रमुख श्री सुधीर भाई शाह पुणे यांनी बहुमोल योगदान दिले आहे*

तसेच राज्य कार्यकारी समितीच्या अनेक मान्यवर सदस्यांचे आर्थीक सहकार्य लाभले आहे

या प्रसंगी राज्य कार्यकारी समिती सदस्य श्री विलास शाह श्री सुशिल शाह, श्री सुधीर शाहश्री जितेन्द्र मेहता,श्री अमोल झव्हेरी, श्री जयेश शाह,श्री नयन शाह, श्री गौरव शाह, श्री महेन्द्र शाह, श्री स्नेहल व श्री प्रकाश शाह उपस्थित होते