महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ सांगली व कै. सुनील (दादा) कलगुटकी फाउंडेशनच्या वतीने मोफत वडार वधु वर मेळावा संपन्न

महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ सांगली व कै. सुनील (दादा) कलगुटकी फाउंडेशनच्या वतीने मोफत वडार वधु वर मेळावा संपन्न

मिरज प्रतिनिधी :- संजय पवार

महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ सांगली व कै. सुनील (दादा)कलगुटकी फाउंडेशन च्या वतीने सांगलीत दैवज्ञ भवन येथे मोफत वधू वर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे धर्मादाय आयुक्त शशिकांत खेडेकर यांनी खर्चाला फाटा देऊन साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न करावा व तोच पैसा वधूवरांच्या भविष्यासाठी खर्च करावा असे आव्हान करण्यात आले यावेळी वडार समाजातील शासकीय विभागात विविध पदावर काम करणारे व करणारे कर्मचारी यांचा सत्कार व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यासाठी वडार समाजातील असंख्य इच्छुक वधू वर उपस्थित होते. यावेळी बऱ्याच इच्छुक वधुनी भावी वर् कसा असावा तो निर्व्यसनी उद्योगधंदा करणारा,शेतकरी असला तरी चालेल अशी मनोगते व्यक्त केली तर इच्छुक वराने वधू कशी असावी ते मनमळावी असावी घर सांभाळण्याची तयारी असावी नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय असला तरी चालेल अशा आशा व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी शशिकांत हर्लेकर धर्मादाय आयुक्त कोल्हापूर, राजेश नाईक माजी स्थायी सभापती मनपा सांगली, मुकुंद पवार प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ, माधुरीताई कलगुटकी माजी नगरसेविका मनपा सांगली, सुनील पाथरवट सह. दुय्यम उपनिबंधक कुपवाड, दिलीप काळे सह. दुय्यम उपनिबंधक हातकलंगले,संजय बनपट्टे, प्रमोद पवार इत्यादी प्रमुखांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी विनायक कलगुटकी, बाळासाहेब दानोळे, आशुतोष कुलगुटकी, श्रीराम आलाकुंटे, सुरेश सावंत, उमेश वडार, राकेश करगुटकी, रवि कुलगुटकी, गणेश साळुंखे, संतोष वडार, संदीप कुलगुटकी, सूर्यकांत कुलगुटकी, संदीप पवार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक कलगुटकी केले तर आभार आशुतोष कुलगुटकी यांनी मानले.