पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षकपदी अॅड. वीरेंद्र मंडलिक

पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षकपदी  अॅड. वीरेंद्र मंडलिक

हमीदवाडा (प्रतिनिधी) : येथील लोकनेते मंडलिक कारखान्याचे संचालक व मंडलिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेच्या निरीक्षकपदी निवड झाली आहे. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व सचिव किरण साळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. वीरेंद्र मंडलिक म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवा सेना अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, आणि आमचे नेत माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कुशल काम करून सार्थ ठरवू. असेही ते म्हणाले.