जिल्हा प्रशासनाकडून पुरग्रस्त भागात भेटी आणि मदतकार्य
कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्हा शहर शहरात पावसाने पुन्हा जोर धरला असून कोल्हापुरात पंचगंगा पाणी पातळी वाढ होत आहे. याच पंचगंगेचे पाणी शहरात काही ठिकाणी गेले असल्यामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार तेथील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी पुरग्रस्त भागात रात्री ११.०० वा. भेट देवून पाहणी केली. सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेवून नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी स्थलांतरित नागरिकांसाठी सुरु केलेल्या निवारागृहात भेटी देवून देण्यात येत असलेल्या सुविधांची पाहणी केली.