प्रयागचिखली उपसरपंच पदी शारदा कांबळे यांची बिनविरोध निवड

प्रयागचिखली उपसरपंच पदी शारदा कांबळे यांची बिनविरोध निवड

करवीर (प्रतिनिधी) :  चिखली  (ता. करवीर) येथील उपसरपंचपदी एस.आर. पाटील गटाच्या शारदा सुनील कांबळे (फिटर) यांची बिनविरोध निवड झाली.

अध्यक्षस्थानी सरपंच रोहित रघुनाथ पाटील होते. माजी उपसरपंच विठ्ठल कळके यांनी ठरल्याप्रमाणे दिलेल्या राजीनाम्यामुळे उपसरपंचपद रिक्त होते. गोकुळचे संचालक एस. आर. पाटील यांच्या गटाकडे नऊ सदस्यांसह बहुमत आहे. रघुनाथ पाटील गटाकडे सरपंचपदासह सात सदस्य आहेत. निवडीनंतर नूतन उपसरपंच शारदा कांबळे यांचा सत्कार झाला. ग्रामविकास अधिकारी सतीश पानारी यांनी आभार मानले.