आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा 21 जून रोजी गुणगौरव सत्कार व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मार्गदर्शन सोहळा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सैनिक स्कूल,जवाहर नवोदय,राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षांसाठी यशस्वी कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रेसर असणारे नाव म्हणजे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोल्हापूर शाखा. या शाखेच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सैनिक प्रवेश मार्गदर्शन सोहळा शनिवारी 21 जून रोजी सकाळी 10.30 वाजता शाहू स्मारक दसरा चौक येथे आयोजित केला आहे.
कोल्हापूर शाखेतून अनेक यशवंत व गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे कार्य आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या संचालिका डॉ. पूजा प्रसाद कुलकर्णी व टीम यांच्या माध्यमातून होत आहे.
या इन्स्टिट्यूट मधून गतवर्षीच्या सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये राज्यात पहिल्या 20 मध्ये 6 विद्यार्थी व अनेक विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड ब्रेक यश संपादन केले आहे. एखादे ध्येय निश्चित केले असेल तर ते अशक्य नाही हे डॉ. पूजा कुलकर्णी यांनी दाखवून दिले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणारे सर्व विद्यार्थी यांचे अथक परिश्रम यांच्या माध्यमातून सैनिकी पॅटर्नसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे नाव आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यट अग्रेसर राहिले आहे.
कल करे सो... आज कर.... आज करे सो.... अभी. या उक्तीप्रमाणे आपल्या पाल्यासाठी आपण दहावी बारावीनंतर खूप खर्च करतो.तोच खर्च त्यांच्या बालपणी पासूनच स्कॉलरशिप, सैनिक पॅटर्न स्कूल,जवाहर नवोदय,राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षांसाठी यशस्वी केला तर मुलांचे भवितव्य हे नक्कीच चांगले होते व ते आय कॅन च्या माध्यमातून पूर्ण होते असे डॉ.पूजा कुलकर्णी यांनी सांगितले.आम्ही नाही तर आमचा निकाल बोलतो हे गतवर्षीच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर प्रदीप देसाईसो,रिटायर्ड आर्मी ऑफिसर किशोर देसाई,प्रमुख उपस्थिती आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे संस्थापक नवनाथ देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या गुणगौरव सोहळा व सैनिकी स्कूल प्रवेश मार्गदर्शन कार्यक्रमासाठी कोल्हापूर भागातील सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक यांनी उपस्थित रहावे असे आय कॅन ट्रेनिंग इन्सिट्यूट संचालिका डॉ. पूजा कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.