बालिंगा पुलावरील वाहतूक बंदच

बालिंगा पुलावरील वाहतूक बंदच
कोल्हापूर-गगनबावडा वाहतूक पुन्हा बंद

कोल्हापूर-गगनबावडा वाहतूक पुन्हा बंद

https://youtu.be/kOmQ79Is0nQ


कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी : 

करवीर तालुक्यातील बालिंगा येथील भोगावती नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने राष्ट्रीय रस्ते महामार्ग मंडळ व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पोलीस प्रशासनास आदेश दिल्याने कोल्हापूर-गगनबावडा वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे.

यामुळे सकाळी नोकरदार वर्गाची फार मोठी कुचंबणा झाली. रस्त्यावर अजून पाणी आलेले नसल्याने रस्ता वहातुकीस खुला करावा कशी मागणी वहानधारकांकडून होत होती. परंतू प्रशासनाने ही मागणी धडकावून लावल्याने वादावादी होऊ लागली. त्यानंतर करवीर तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी पहाणी करून वाहतूक मार्ग बंद केला.

       

आज सकाळपासून वहानांची गर्दी होऊन अडथळे निर्माण होत असल्याने या मार्गावरील वहातुक रोखून धरण्यात आली आहे. दरम्यान प्रवाशांकडून भोगावती नदीवरील पूलाची कोणतीही कमान अथवा पिल्लंर हललेला नाही तर मग वाहतूक बंद का? असा संतप्त सवाल करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाला जर वहातूक बंदच करायची असेल तर किमान नोकरदार व विद्यार्थी तसेच आजारी पेशंटची व्यवस्था बोटीतून करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.