रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या मुंबई महिला संघटक प्रमुखपदी सुषमा अत्तरदे यांची निवड

रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या मुंबई महिला संघटक प्रमुखपदी सुषमा अत्तरदे यांची निवड

पुणे प्रतिनिधि: रुग्ण हक्क संघर्ष समिती प्रमुख ॲड विजयभाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण हक्क च्या पुणे शहर कार्यालयात पुणे महिला प्रमुख मिनाक्षीताई शेटे यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली.

यावेळी किरण पाचपांडे यांनी सुचवलेल्या रुग्ण हक्क संघर्ष समिती चे सदस्या सामाजिक क्षेत्रात व सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे विविध समाज हितार्थ उपक्रम राबविणारे व सामाजिक क्षेत्रातील त्यांची आवड पाहून सुषमा शांताराम अत्तरदे यांची मुंबई महिला संघटक प्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळी मुंबई विभागीय प्रमुख प्रशांत ढोणे, अंबरनाथ महिला तालुकाध्यक्षा सुजाता गायकवाड, संस्थापक सचिव विश्वास कुलकर्णी, सह सचिव संतोष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघटक किरण बडे, जिल्ह्याध्यक्ष रवी गजे, महिला जिल्हाध्यक्षा मंगल अशोक जाधव, व पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा माधुरी कोलते, उपाध्यक्षा किरण पाचपांडे, पुणे शहराध्यक्ष संजय बावळेकर, गायत्री देभे, कल्पना जाधव, मनिषा आगळे , कल्पना जाधव, राहुल ताटे, विशाल जाधव, रमजान मुलाणी, शशांक घाडगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.