HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अनियमित व अवेळी पाणीपुरवठ्यामुळे आर. के. नगर येथील नागरिक हैराण... प्रशासनाचं दुर्लक्ष

अनियमित व अवेळी पाणीपुरवठ्यामुळे आर. के. नगर येथील नागरिक हैराण... प्रशासनाचं दुर्लक्ष
अनियमित व अवेळी पाणीपुरवठ्यामुळे आर. के. नगर येथील नागरिक हैराण... प्रशासनाचं दुर्लक्ष

आर. के. नगर भागामध्ये पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. २००८ सालापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून एकूण १३ गावांना आपल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नियमित पाणीपुरवठा करणे हे कार्य अत्यंत बेजबाबदारपणे केले जाते, यावर गेले बरेच दिवस कमीत कमी ४ ते ५ वेळेला आपल्या अधिकाऱ्यांसमवेत मिटिंग झाले असून त्यातून विभागाचे कार्य कोणत्याही पद्धतीने सुधारलेले नाहीं हि वस्तुस्तिथी असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

 सुदैवाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्तिथी नसताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आर. के. नगर भागावर दुष्काळ सदृश परिस्तिथी निर्माण केली आहे. महिन्यातील तीस दिवसांपैकी जेमतेम आठ ते नऊ दिवस पाणीपुरवठा करणे तोही अपुरा व अनियमित तसेच कोणत्याही वेळेस पाणीपुरवठा करणे, या परिस्थितीला सामोरे जाऊन लोकांनी खालील मुद्दांवर स्पष्टीकरण मिळावे अशी अपेक्षा या निवेदन द्वारे व्यक्त केली आहे 

१. अपुरा व अनियमित पाणीपुरवठा.

२. अपुरा पाणीपुरवठा असताना पाण्याचे मीटर रिडींग कश्यासाठी प्राधिकरणाकडून करण्यात येते.

३. पाण्याचे बिल न भरण्यासाठी लोकांनी सामोहिक निर्णय का घेऊ नये.

वास्तविकदृष्ट्या ज्या आर. के. नगरच्या भागामध्ये आज पर्यत नियमित बिल भरली जातात, त्या भागामध्ये पाणीपुरवठा योग्य रीतीने झाला पाहिजे जे थकबाकीदार आहेत, त्या लोकांवर कारवाही झाली पाहिजे तसेच अपुरा पाणीपुरवठा असताना पाण्याचे बिल वाढीव दराने न घेता लोकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कारवाही करणे, तूर्तास कार्पोरेशन लाईनमधून आमच्या भागास पाणीपुरवठा जोडला जावा जेणेकरून एक यां प्रश्नावर मार्ग निघेल. तसेच आर के नगर मध्ये अनियमीत व अपुरा पाणी पुरवठा, कचरा गाडी वेळेवर न येणे, इत्यादी कारणामुळे आम्ही सर्व त्रस्त नागरीक लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणारं असा इशारा ही यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांना दिलाय. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.