मलकापूरमधील बंद सीसीटीव्ही सुरू करा; मनसेची मागणी

मलकापूरमधील बंद सीसीटीव्ही सुरू करा; मनसेची मागणी
सीसीटीव्ही सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

रोहित पास्ते / मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर शहरातील बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मागणी आज मनसेच्यावतीने करण्यात आली. मलकापूर शहराध्यक्ष अजय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली या मागणीचे निवेदन मलकापूर नगरपरिषद मुख्याधिकारी विद्या कदम यांना देण्यात आले. 

शहरातील सीसीटीव्ही हे बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने शहरातील काही भागातील रस्त्यावरील विद्युत खांबाची लाईट नसल्याने अंधाराचा गैरफायदा घेऊन शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशावेळी शहरातील सीसीटीव्ही बंद असणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे शहरातील सीसीटीव्ही लवकरात लवकर सुरू करावेत अशी विनंती मनसेच्यावतीने करण्यात आली. जर सीसीटीव्ही सुरू झाले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. 

यावेळी सहकार सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे, शहर उपाध्यक्ष अमोल सोनावळे, सुरज गोसावी, साहिल जाधव हे उपस्थित होते.