HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अमित शहांनी अकलेचे तारे तोडणे थांबवावे अन्यथा जशास तसे उत्तर - अनिल घाटगे

अमित शहांनी अकलेचे तारे तोडणे थांबवावे अन्यथा जशास तसे उत्तर - अनिल घाटगे

पुणे प्रतिनिधि: पुण्यातील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी अकलेचे तारे तोडत देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्यावर टीका करत असताना भ्रष्टाचारा बरोबरच त्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी काय केलं असा प्रश्न केला आणि तो ही पुण्यात जो पुणे जिल्हा शरद पवार नी घडवला चोहोबाजूंनी उद्योगधंदे उभे केले ,आदर्श शिक्षण संस्था उभा केल्या, महाराष्ट्राचे कृषिमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकरायच्या बांधावर जाऊन महाराष्ट्र शेती उत्पादनाबाबत स्वयंपूर्ण बनवण्या बरोबरच धवल क्रांती केली केली, उद्योगधंद्या मध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर बनवला. कित्येक धरणांची निर्मिती केली सत्ता गेली मराठवाडा विद्यापीठा चे नामांतर करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले. सर्वप्रथम महाराष्ट्रात 33% महिलांसाठी आरक्षण देऊन महिलांना राजकारणात प्रवेश दिला, देशाचे संरक्षण मंत्री म्हणून संरक्षण खात्यात प्रथमच महिला भरतीचा निर्णय घेतला, देशाचे कृषिमंत्री म्हणून संपूर्ण देश कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण बनवला, काश्मीर ते कन्याकुमारी कृषी विकासाची मुहूर्तमेढ रोवली कृषी तज्ञांना मानसन्मान दिला कृषी निर्यात धोरण तयार केले कृषिमंत्री म्हणून गुजरात राज्याला काय काय दिले हे जरा नरेंद्र मोदींना विचारा मोदीजींनी स्वतः पुण्यातल्या भाषणामध्ये मुक्तकंटांनी शरद पवारांचे स्तुती केली होती त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही असे सांगितले तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नितीनजी गडकरी यांना विचारा आणि मग अमित शहा यांनी आपले तोंड उघडावे उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला हे थांबवावे लोकसभेत आपकी नारा 45 + दिला होता त्याचा पुरता पंचनामा शरद पवारांनी केला 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणल्या एवढ्यावरून थोडा धडा घ्या. 

उरला प्रश्न भ्रष्टाचारावर बोलण्याचा तो अधिकार तुम्ही कधीच गमावला आहे देशातील सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना घेऊन आपण मूळ भाजप संपवली आहे आठवते का खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटीचां भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि चार दिवसात अजित पवारांसह 40 जणांना घेऊन अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले ही जनता विसरलेली नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची योग्यता देशाने ओळखली आहे जरी लोकसभेत सत्ता आली असली तरी महाराष्ट्रामध्ये औषधाला भाजप शिल्लक उरणार नाही कारण महाराष्ट्र ही संतांची, शिवरायांची, समाजसुधारकांची, स्वतंत्र सैनिकांची, वीरांची भूमी आहे. येथे होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही महाराष्ट्रातील युवकांच्या तोंडचा घास आपण गुजरात निवडणुकीच्या वेळी जवळपास आठ उद्योग धंदे गुजरातला नेलेत त्याची परतफेड व्याजासकट उद्याच्या विधानसभेत जनता करेल इथून पुढे पवार साहेबांच्या वर बोलत असताना जीप सांभाळून बोला. असं मत अनिल घाटगे यांनी व्यक्त केलं.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.