पत्रकारांच्या विकासासाठी देखील होणार मोठ्या घोषणा

पत्रकार- सुभाष भोसले

समस्त पत्रकार समुदायाच्या विकासासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन अर्थात केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. या संघटनेचा तिसरा वर्धापनदिन सोहळा १६ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. 

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन हि संघटना गेल्या ३ वर्षांपासून पत्रकारांच्या विकासासाठी विविध पातळीवर काम करते आहे. मागील २ वर्षांच्या कोविड काळात देखील संघटनेच्या विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने येऊन जनसमुदायासाठी जमिनिस्तरावर उतरून वैद्यकीय सेवा, घरगुती उपयोगी सामान अश्या विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या आहेत.

"हि संघटना म्हणजे माझे कुटुंब आहे आणि कुटुंबप्रमुख म्हणून पत्रकारांसाठी काहीही करायला मी तयार आहे" असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संदिप कसालकर यांनी सांगितले आहे.

१६ एप्रिल २०२३ रोजी असणाऱ्या वर्धानपनदिनामिनीत्त महाराष्ट्रभरातून प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामधील दिग्गज पत्रकारांची उपस्थित देखील या दरम्यान राहणार आहे. हा सोहळा सकाळी १०:३० वाजल्यापासून सुरु होणार आहे. सांगली येथील विश्रामबाग, खरे सांस्कृतिक भवन येथे सदर कार्यक्रम पार पडणार असून या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जि

ल्ह्याचे पालकमंत्री सुरेश (भाऊ) खाडे, आमदार सुधीर (दादा) गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्ह्या बँकेचे उपाध्यक्षा जयश्री ताई पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, ज्येष्ठ पत्रकार धनंजय पाठक उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे के वाय ए. न्यूज या राष्ट्रीय ऍपचे संस्थापक देवेश गुप्ता, संचालक गौरव शेट्ये यांचीदेखील या प्रसंगी उपस्थिती असणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे सांगली जिल्हा केंद्रीय पत्रकार संघ यांनी केले आहे.

सोहळ्यादरम्यान पत्रकारांच्या विकासासाठी केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. तर्फे आखल्या गेलेल्या विविध योजनांविषयी देखील महत्वाच्या घोषणा करण्यात येणार आहे. तसेच Kya News च्या पहिल्या मोहिमेचे उदघाटन देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान संघटनेमध्ये महत्वाची पदनियुक्ती सुद्धा होणार असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी म्हटले आहे.