महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टोरेटचे डिप्टी डायरेक्टर जनरल यांची टीकेआयटीला भेट

महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टोरेटचे डिप्टी डायरेक्टर जनरल यांची टीकेआयटीला भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) वारणानगर येथे महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टोरेटचे डिप्टी डायरेक्टर जनरल, ब्रिगेडियर व्ही एन कुलकर्णी आणि कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अभिजीत वाळिंबे यांनी भेट दिली. यादरम्यान छात्रसैनिकांना "एनसीसी स्पेशिअल एन्ट्री स्कीम" तसेच अभियांत्रिकी पदवीधरांसाठी असलेल्या "टेक्निकल एन्ट्री स्कीम" संदर्भात ब्रिगेडियर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. छात्रसैनिकांनी एसएसबीची तयारी प्रथम वर्षापासूनच करावी जेणेकरून भारतीय लष्करामध्ये अधिकारी म्हणून सेवेत जाण्यासाठी अधिकधिक संधी उपलब्ध होतील. तसेच एसएसबी साठी आवश्यक असणाऱ्या स्किल्स संदर्भात ब्रिगेडियर अभिजीत कोळंबी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन माने, स्कूल ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट चे डीन डॉ एस एम पिसे, महाविद्यालयाचे असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट आर बी नाईक तसेच वारणा सेक्टरमधील एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ एस एस खोत, लेफ्टनंट सौ गायकवाड, सेकंड ऑफिसर श्री संदीप रोकडे आणि एन सी सी चे छात्र सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ व्ही. व्ही. कारजिन्नी आणि अध्यक्ष मा. डॉ विनयरावजी कोरे सावकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एम. पिसे यांनी चालू वर्षापासून अभ्यासक्रमात सुरू होणाऱ्या डिफेन्स सर्विसेस होनीणरी या अभ्यासक्रमाची माहिती दिली. कोरे अभियांत्रिकीत डिसेंबर 2020 पासून एनसीसी चालू झाली असुन या कालावधीमध्ये कॅडेट तेजस डफळे हा टेक्निकल एन्ट्री स्कीम अंतर्गत लेफ्टनंट या पदाकरिता प्रशिक्षण घेत आहे. तसेच महाविद्यालयातील शुभम पंडित हा टेक्निकल एंट्री स्कीम अंतर्गत लेफ्टनंट या पदावर रुजू झाला आहे. याबरोबर तीन छात्र अग्निवीर म्हणून नियुक्त झाले आहेत.