केंद्र सरकारकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
केंद्र सरकारने लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करण्यासाठी परवानगी लागणार आहे.
सरकारच्या मेक इन इंडिया या उपक्रमाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार लॅपटॉप, टॅबलेट, वैयक्तिक संगणक आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर संगणक आणि सर्व्हरची आयात तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळं चीनसारख्या देशातून होणारी आयात कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबरच या निर्णयामुळे देशात सातत्याने उत्पादन करणाऱ्या, स्थानिक पुरवठ्याला चालना देणाऱ्या आणि इतर देशांमध्ये निर्यात करणाऱ्या स्थानिक आणि परदेशी उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.