शरद कृषी चे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत यश

जैनापूर - जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय येथील प्रगती संतोष कर्नाले (प्रथम वर्ष) या विद्यार्थिनीने अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये महात्मा फुले राहुरीच्या संघात खो - खो या सांघिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धा आचार्य नरेंद्र कृषी एवं प्राद्योगिक विश्वविद्यालय कुमारगंज अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे दिनांक झाल्या.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, संस्थेचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका कोळी, संजय फलके व क्रीडा शिक्षक दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.