शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांच्या याद्या सामनातुन जाहीर होणार.

शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांच्या याद्या सामनातुन जाहीर होणार.

 महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागांचं कोड अजून सुटलेलं नाहीये. काँग्रेस ,राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटाकडून अजून काही जागेंचे उमेदवार जाहीर झाले नाहीयेत. याबाबत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार आणि मतदारसंघ अशी यादी तयार करण्यात आली आहे. जागा वाटपाचा तिढा कायम असताना मात्र उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाऱ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहेत. यात शिवसेना गटाची पहिली यादी १५ ते १६ जागांसाठी निश्चित उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.       

आज मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची लोकसभा निवडणूक २०२४ साठी जागेवाटपावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. शिवसेना आपल्या पहिल्या यादीत रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या वाद नसलेल्या मतदारसंघांतील उमेदवाराची घोषणा करु शकते. लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट २० जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट १० आणि काँग्रेस १६ अशा जागा लढवण्याची श्यक्यता आहे.अशातच उद्धव ठाकरेंची पहिली यादी तयार झाली असून ती उद्या सामनातून जाहीर करण्यात येणार आहे.