शिवाजी विद्यापीठात डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या इमारतीसमोरील डॉ. बापूजी साळुंखे पूर्णाकृती पुतळ्यास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्र - कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, संशोधक विद्यार्थी, प्रशासकीय सेवक आदी उपस्थित होते.