राधानगरी धरणाचा सहावा दरवाजा पुन्हा उघडला

राधानगरी धरणाचा सहावा दरवाजा पुन्हा उघडला
जिल्ह्यातील 57 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून २८२८ क्यूसेक इतका विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गेल्या बारा तासापासून राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी 41 फूट 2 इंचावर आहे. राधानगरी धरण परिसरात आज सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने राधानगरी धरणाचा क्रमांक ६ चा दरवाजा आज दुपारी उघडला आहे.

पंचगंगा नदीवरील - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, 

भोगावती नदीवरील – शिरगाव, तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे. 

कासारी नदीवरील – यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण व कुंभेवाडी. 

हिरण्यकेशी नदीवरील – गिजवणे व निलजी. 

वेदगंगा नदीवरील – निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, गारगोटी, म्हसवे. 

कुंभी नदीवरील – कळे, शेनवडे, वेतवडे, मांडूकली व असळज. 

वारणा नदीवरील – चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, खोची, शिगांव व मांगले सावार्डे. कडवी नदीवरील- शिरगांव, सवते सावर्डे व सरुड पाटणे. 

ताम्रपर्णी नदीवरील – कुर्तनवाडी, चंदगड. 

दुधगंगा नदीवरील – दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली व बाचणी. 

धामणी नदीवरील – सुळे व आंबर्डे. 

तुळशी नदीवरील – बीड व आरे असे एकूण 57 बंधारे पाण्याखाली आहेत.

पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 41.4 फूट, सुर्वे 39.2 फूट, रुई 69.3 फूट, इचलकरंजी 64.2, तेरवाड 56.7 फूट, शिरोळ 50.8 फूट, नृसिंहवाडी 50.8 फूट, राजापूर 38.4 फूट तर नजीकच्या जिल्ह्यातील सांगली 17.9 फूट व अंकली 38.4 फूट अशी आहे.

जिल्हयातील धरण पाणीसाठा :

कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजता प्राप्त अहवालानुसार धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसी मध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे.

राधानगरी – 8.27 (8.361 टी. एम. सी), तुळशी 2.11 (3.471 टी. एम. सी), वारणा 29.24 (34.399 टी. एम. सी), दुधगंगा 16.54 (25.393 टी. एम. सी), कासारी 2.28 (2.774 टी. एम. सी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.22 (2.715 टी. एम. सी), पाटगाव 2.95 (3.716 टी. एम. सी), चिकोत्रा 1.02 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.07 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.58 (1.223), घटप्रभा 1.56 (1.560), जांबरे 0.82 (0.820 टी. एम. सी ) आंबेओहोळ 1.11 (1.240 टी. एम. सी ) आणि कोदे ल. पा. 0.21 (0.214).