शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

कोल्हापूर : मराठी साहित्यास भारतीय ज्ञानपीठाचे पहिले परितोषिक मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आले. 

वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते वि.स. खांडेकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी मराठी अधिविभाग प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे, रवी लोंढे, डॉ. दत्तात्रय मचाले, श्रीराम सुतार, तबस्सुम पठाण,डॉ. उदयसिंह राजेयादव  तसेच स्मृती संग्रहालयातील सहकारी नितीन गंगधर,  ऐश्वर्या भुरटे, वैशाली महाडिक आदी उपस्थित होते.