स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची मोठी घोषणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची मोठी घोषणा
देशाभरात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात अन्नत्याग आंदोलन

https://youtu.be/18KlrxMzo7c

कोल्हापूर / प्रतिनिधी :

मणिपूरसह देशाभरात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे.

मणिपूर येथील महिलांवर अत्याचार झालेल्या घटनेला अडीच महिन्यांचा कालावधी होऊनही अत्याचार करणारे नराधम मोकाट फिरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने फटकारे मारूनही राज्य आणि केंद्र सरकारकडून कोणतीच कारवाई होत नाही. राज्याचे मुख्यमंत्री यांनी अशा अनेक घटना घडल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यातुन एक प्रकारचा बेजबाबदारपणा दिसून येतो. सरकारबरोबरच या देशातील नागरिकांची सुध्दा आपल्या आया-बहिणींना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक या नात्याने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी प्रायश्चित म्हणून २४ जुलैला ७२ तास अन्नत्याग आंदोलन करण्यात निर्णय घेतल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. इचलकरंजी येथील गांधी पुतळ्याजवळ सकाळी १० वाजल्यापासून हे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.