कोल्हापुरातील बाबू जमाल नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना

कोल्हापुरातील बाबू जमाल नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना
कोल्हापुरातील बाबू जमाल नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना

कोल्हापूर / प्रतिनिधी : 

हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेल्या करवीर नगरीत मोहरम सणाची सुरुवात झाली आहे. काल गुरुवारी कुदळ टाकण्याचा विधी झाल्यानंतर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबू जमाल नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर आता भाविकांनी पंजाचे दर्शन घेण्यासाठी सुरुवात केली आहे.

मोहरम निमित्त कोल्हापुरात सर्वप्रथम बाबू जमाल नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना होते. त्यानंतर शहरातील प्रमुख तालमी दर्गे आणि मंडळामध्ये पंज्यांची प्रतिष्ठापना होते. बाबू जमाल नाल्या हैदर पंजाच्या नैवेद्य सन्मान हा जाधव कसबेकर घराण्याकडे आहे.

पंजे प्रतिष्ठापना झाल्यानंतर सहाव्या ते सातव्या दिवशी पंजे पारंपारिक वाद्याच्या गजरात भेटीसाठी बाहेर पडतात. यंदा 29 जुलै रोजी शुक्रवारी खत्तलरात्र तर ३० जुलै रोजी ताबूत विसर्जन विधी पार पडणार आहे.