अतंर्गत वाद संपवणे काळाची गरज – पोलीस महासंचालक रजनीश सेठ
अतंर्गत वाद संपवणे काळाची गरज – पोलीस महासंचालक रजनीश सेठ
प्रतिनिधी मुंबई
जे स्वातंत्र्यहीन जिवन गुजारन करत आहेत जे आजदेखील अन्न वस्त्र निवारा विना व शासकीय सुविधांपासुन कोस दुर दुर्लक्षित लोक जिवन गुजारन करत आहेत अशा पिढीताच्या हितासाठी माझे संपुर्ण आयुष्य आर्पण केले आहे. एक दिवस आदिवासी पारधी समाजाला लागलेला कलंकित डाग पुसून काढीन एवढेच माझे स्वप्न आहे - आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले
आज पुणे शहर व पुणे ग्रामीण, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड येथील आदिवासी वर होणारे अन्याय थांबवण्यासाठी कडक शासन केले जायील या विषयावर विशेष लक्ष दिले जाईल. ज्या कुटुंबांना स्वातंत्र्यहीन जीवन गुजारणाची वेळ आली आहे आणि ज्यांच्या कडे कलंकित नजरेने पाहिले गेले अशा आदिवासी कुटुंबांसाठी गेले 22 ते 23 वर्ष विना अपेक्षित काम करणारे साहित्यिक नामदेव भोसले यांनी विशेष कार्य केले आदिवासी भितीमय लोक व पोलीस यांच्यातील कलंकित दरी कमी करुन महाराष्ट्र राज्यात हजारो गरीब कुटुंबातील लोकांना गावांमध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आहे, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले त्यांना लागणारे जातीचे दाखले, रेशनिंग कार्ड,आधार कार्ड, घरकुल योजनेतील घरकुल मिळवून देऊन महाराष्ट्रातील हजारो कुटुंबातील लोकांना मुख्य प्रवाहात आणले. प्रत्येक पिढीत कुटुंबाचे दुःख कमी करणारे व पिढीत कुबांना न्याय मिळवून देणारे पुणे येथील नामदेव भोसले यांचे कामाचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे असे मत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी व्यक्त केले.
साहित्यिक नामदेव भोसले हे आज महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक मा. रजनीश सेठ यांची भेट घेतली यावेळी आदिवासी पारधी बांधवांच्या समस्या विषयी माहीती निवेदनाद्वारे पोलीस महासंचालक यांच्या समोर सविस्तर मांडल्या आहेत. पुणे ग्रामीण,पुणे शहर,औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बिड येथील आदिवासीना जातीय भेदभावाच्या व शंकेच्या ढिगाऱ्यात चेपले जात आहे. ते थांबविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी नामदेव भोसले यांनी केली आहे. यावेळी आदिवासी पारधी बोली भाषा लिखित मराशी पुस्तक भेट देऊन पोलीस महासंचालक रजनीश सेठ साहेब यांना दिले. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक मा. प्रवीणजी साळुंखे साहेब, मुबई झोन दोनचे पोलीस उआपायुक्त मा डाॅ अभिनव देशमुख साहेब व पोलीस अधीक्षक, मा. तानाजी चिखले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक मा.नितीन बगाटे यांची देखील भेट घेतली. दरम्यान यावेळी सौ. गौरीताई नामदेव भोसले, व सहपरिवार भोसले यांनी सगळ्यांच्या भेटी घेतल्या यावेळी महाराष्ट्रातील आदिसीच्या विषयी सविस्तर चर्चा केली.