कागलमध्ये मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा सत्कार व जाहीर सभा....

कागलमध्ये मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा  सत्कार व जाहीर सभा....

पत्रकार- सुभाष भोसले

कागल, दि.०६ कागलमध्ये शुक्रवार दि. ७ रोजी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे अभूतपूर्व व जल्लोषी स्वागत करूया, असा निर्धार कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला.*

संध्याकाळी ४.०० वाजता येथील ऐतिहासिक गैबी चौकात नामदार मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार व जाहीर मेळावा होणार आहे.*

नामदार हसन मुश्रीफ मंत्रीपदाच्या शपथेनंतर प्रथमच कागलमध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, राजकीय जीवनात अनेकदा वेगवेगळे निर्णायक प्रसंग येतात. यावेळी निर्धाराने पुढे जावेच लागते. या माध्यमातून गोरगरीब, दीनदलित, वंचित, उपेक्षित लोकांसाठी अधिक जोमाने कार्यरत राहू. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत. मिळालेल्या सत्तेचा वापर कशा पद्धतीने करायचा हे येत्या काळात दाखवून देऊ, युवराज बापू पाटील म्हणाले, वाड्या वस्त्यांवर पसरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातील तमाम स्वाभिमानी कार्यकर्ते मंत्री मुश्रीफांच्या पाठीशी राहतील.

स्वागत व प्रास्ताविक कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर यांनी केले.*

कार्यक्रमास बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, कागल तालुका संघाचे चेअरमन जीवन शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, रंगराव पाटील, शामराव पाटील, जयवंत पाटील-कासारीकर, पंचायत समितीचे माजी सभापती जयदीप पोवार, सूर्याजी घोरपडे, संजय चितारी, इरफान मुजावर, निलेश शिंदे, मयूर आळवेकर यांच्यासह कागल, मुरगुड नगरपरिषदेचे नगरसेवक, विविध गावातील सरपंच,उपसरपंच विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादीच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी मानले.*

===============