कोतोली येथे पोलिस चौकी सुरू करण्याची लोकराज्य जनता पार्टी ची मागणी

कोतोली येथे पोलिस चौकी सुरू करण्याची लोकराज्य जनता पार्टी ची मागणी

पत्रकार- सुभाष भोसले

कोतोली ता.पन्हाळा येथे आजूबाजूच्या अनेक वाड्या वस्तीवरील लोक बाजारहाट करण्यासाठी येत असतात. पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ कोतोली आहे. अनेक तरुणांनी बँकांची कर्जे काढून छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आहेत.सध्या कोतोली बाजारपेठेत भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.आठवडा बाजार मंगळवारी असतो.या दिवशी या चोऱ्यांच्या प्रकार सतत घडत असतात.या भागातील बजारपेठेचे केंद्र व व्यावसायिक व लोकांच्या सुरक्षीततेचा विचार करून कोतोली येथे पोलिस चौकी सुरू करणेत यावी अशी मागणी लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केली आहे.पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना या मागणीचे निवेदन देताना लोकराज्य जनता पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कांबळे,सरचिटणीस शशिकांत जाधव,बाळकृष्ण गवळी, नाथाजी राजमाने,पी. के.पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.