21 जून या जागतिक योगदिना दिवशी जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरणार,प्रहार संघटनेची मागणी झाली मान्य.
पत्रकार- सुभाष भोसले
यासंदर्भातील माहिती अशी की 21 जून या जागतिक योग दिना दिवशी देशासह परदेशातही योगासने व इतर व्यायाम प्रकार घेतले जातात. प्राचीन व थोर भारतीय परंपरेला जागतिक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या या दिनादिवशी सांगली जिल्ह्यासह सर्वत्र विद्यार्थ्यांकडून विविध योगासने केली जातात. या प्रकारची योगासने घेण्यासाठी शाळा सकाळची वेळ योग्य असते.शाळेत पर्यावरण आणि बालमानसशास्त्राचा विचार करता हि योगासने ही सकाळच्या वेळेतच घेणे योग्य आहे.त्यामुळे बुधवार दि.२१ जून या जागतिक योग दिनादिवशी शाळा सकाळ सत्रात ७.३० ते ११.३० या वेळेत घेण्याची मागणी सांगली जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेने केली होती.शिक्षणाधिकारी श्री मोहनराव गायकवाड यांनी यासंदर्भातील पत्र काढण्यात येत असल्याचे प्रहार संघटनेला आश्वासन दिले होते.शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कायमच पुढाकार घेणारी प्रहार शिक्षक संघटनेने अल्पावधितच शिक्षकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.ना. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या प्रहार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय शिक्षकांना मिळाल्याचे बोलले जात आहे.विद्यार्थी विकास व त्यांचे शिक्षण याला प्रथम प्राधान्य देत शिक्षक प्रश्न सोडवणाऱ्या प्रहार संघटनेचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे.
शिक्षणाधिकारी श्री मोहनराव गायकवाड यांनी 21 जून रोजी शाळा 7.30 ते 12 या वेळेत घेऊन योगदिन साजरा करनेचे आदेश दिलेले आहेत