कै.सचिन बाळासाहेब लोहार यांचा उद्या बारावा दिवस

पञकार-नारायण लोहार
सिंधुदुर्ग दि.28एप्रिल-बेनाडी ता.चिक्कोडी जि.बेळगाव येथील युवक सचिन बाळासाहेब लोहार यांचे वयाच्या 42व्या वर्षी आकस्मिक निधन झाले .त्याचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. जेमतेम 6वी पर्यंत शिक्षण घेऊन आपले करियर यशस्वी करत असताना सचिन लोहार याच्यावर काळाने घाला घातला. सचिन आपल्या कामाला निपाणी येथे मेकॅनिकल म्हणून सुरूवात केली. 4ते5वर्ष गेल्यानंतर आपला मुक्काम सचिनने पुणे भोसरी येथे हालवला. भाडेतत्वावर एक दुकानगाळा घेऊन फोर व्हीलरचे गॅरेच घातले.खाञीशीर कामामुळे सचिनचा भोसरी भागात नामांकित मेकॅनिक म्हणून नावलौकिक झाला. भोसरी येथे बरेच रहिवासी सचिनच्या बेनाडी गावातील आहेत. सचिनचे गॅरेच म्हणजे बेनाडीकरांचा जणू कट्टाच असायचा.बेनाडीतील एक उद्योजक कुमार पाटील सचिनच्या वडिलांचे सांत्वन करताना म्हणाले की सचिन तुम्हा आईवडिलांपेक्षा आम्हाला फार जवळचा आहे. सचिनला बेनाडीतील सर्व घडामोडी ताबडतोब समजत होत्या. त्याचा भोसरीत मोठा मिञ परिवार होता.मिञांनीच सचिनचे दवाखान्यातील बील भरलेले होते.दि.18एप्रिल रोजी सचिनचे डाॅ. डी.वाय पाटील हाॅस्पिटल पूणे येथे निधन झाले. त्याच्या अकाली जाण्याने सर्व कुटुंब,नातेवाईक व मिञपरिवार हादरून गेला.पुण्यात त्याने बंगला बांधला आहे. त्याची वास्तुशांती मे महिन्यात सचिन करणार होता परंतु त्याचीही इच्छा अपुरीच राहिली.बेनाडीतील काही मिञमंडळी सचिन नेहमी हसतमुख असायचा अशी आठवण काढतात.जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला असचं सचिन बाबतीत झाले.सचिन पश्चात आईवडील,भाऊ,दोन मुली व एक मुलगा व पत्नी असा मोठा परिवार आहे. अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी या उक्तीप्रमाणे सचिनच्या करिअरचा झंझावात त्याच्या अकाली जाण्याने थांबला.त्याच्या निधनाची वार्ता कळताच सर्व परिसरात शोककळा पसरली. नशीबचा लेखाजोगा कोणाच्या वाटेला ,जो आला तो संपला आणि शेवटी गेला असेच सचिन लोहारच्या बाबतीत म्हणावे लागेल.