सावंतवाडी आंबोली घाटात रात्रीच्या वेळेसच अवजड वाहनांची वर्दळ का? वरद हस्त नक्की कोणाचा?
अमित वेंगुर्लेकर
सावंतवाडी मधील रम्य मिनी महाबळेश्वर म्हणून ग्यात असलेले एक रम्य पर्यटन स्थळ म्हणून आंबोली घाटातील धबधब्याचे वर्णन केले जाते. पावसाळ्यात येथे पर जिल्ह्यातील पर्यटक येतात. कवळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी व मुख्य धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी नेहमीच दिसून येते.या हंगामात आंबोली येथील हॉटेल व्यवसाय हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात चालतो,धबधब्याच्या एका बाजूने गावातील लोकांचा हॉटेल व्यवसाय सुरू असतो पण जेव्हा पावसाळ्यात दरड कोसळली जाते तेव्हा आंबोली घाटातील वाहतूक बंद ठेवावी लागते.एकंदरीत या बाबत माहिती घेतली असता अवजड वाहनांची रहदारी ही संबंधित शासकीय खात्याने बंद केली असून सुद्धा रात्रीच्या वेळीस वाफोली रोड ते आंबोली बस स्टँड दरम्यान दोन पोलिस तपासणी बंदोबस्त तैनात असलेल्या या सावंतवाडी ते आंबोली घाटातील अवजड वाहतूक होतेच कशी? याबाबत जबाबदार शासकीय अधिकारी यांनी वेळीच बंदोबस्त करावा जेणे करून सर्वसामान्य जनतेचे व्यवसाय सुरू राहतील,कारण सावंतवाडी बाजारात भाजीपाला, फळे,कडधान्य ही घाटमाथ्या वरूनच वाहतूक होते.तसेच सदर घाटातील काही भाग हा फॉरेस्ट खात्याच्या अक्त्यारीत आहे त्यामुळे योग्य वेळेस नियोजित दुरुस्ती करण्यास शासनालाही अडथळे निर्माण होत आहेत.भविष्यात आंबोली घाटातील वाहतूक बंद होऊ नये यासाठी शासनाने या प्रकरणातील वरदहस्त यांचा तपास घेवून घाटातील अवजड वाहनांची अनधिकृत वाहतूक त्वरित थांबवावी व नियमाचे उल्लघन करणाऱ्या अवजड वाहन चालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून केली आहे