कोल्हापूर शहराचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण त्यांचा आज पहिला स्मृतीदिन

कोल्हापूर शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे लोकप्रतिनिधी स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे

कोल्हापूर शहराचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण त्यांचा आज पहिला स्मृतीदिन

कोल्हापूर शहराचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण त्यांचा आज पहिला स्मृतीदिन

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

कोल्हापूर शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे  लोकप्रतिनिधी स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे.आज सोमवारी त्यांचा पहिला स्मृतीदिन आहे. त्यांचा प्रथम स्मृतिदिन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत श्री राम सास्कृतिक भवन इथं पार पडला. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, विनायक फाळके, राजू लाटकर यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.