तंत्रज्ञान विकासासाठी ज्ञानाचा मूळ पाया मजबूत असला पाहिजे - विशाल देशमुख

कोल्हापूर प्रतिनिधी - केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने आज महाविद्यालयामध्ये जगविख्यात अशा कॉग्निझंट कंपनी च्या पदाधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आयोजित केले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भविष्यामध्ये ए.आय. या तंत्रज्ञानाच्या उपयोगितेबद्दल भाष्य केले. अशा तंत्रज्ञाना मध्ये स्वतःचे कौशल्य वाढवून स्वतःसाठी विशेष संधी विद्यार्थ्यांनी निर्माण केल्या पाहिजेत असे उद्गार त्यांनी काढले. याचवेळी त्यांनी केआयटी महाविद्यालय येथील दर्जात्मक शिक्षण, त्याची परंपरा, वर्तमानात सुरू असलेल्या विविध योजना ,भविष्यातील केलेला विचार उपस्थितांसमोर थोडक्यात मांडला.
कॉग्निझंट कंपनीचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट श्री. विशाल देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सतत नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये संवाद कौशल्य,एकत्रित काम करण्याची वृत्ती, थेट प्रश्न सोडवण्याची क्षमता,आपल्या कामाबद्दल असलेला आपला सकारात्मक दृष्टिकोन अशा विविध पैलूंना महत्व व प्राधान्य देण्याची आवश्यकता व्यक्त केली. कोणत्याही तंत्रज्ञानातील विकासासाठी आपल्या मूळ ज्ञानाचा पाया मजबूत असला पाहिजे अशा प्रकारच्या विविध महत्त्वाच्या गोष्टींबाबत त्यांनी मनोगत व्यक्त केले.
कंपनीच्या सीनियर मॅनेजर-(एच.आर) शिल्पा महाजनी यांनी कंपनी ची नवीन उमेदवारांना शोधण्याची निवडण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.कोणकोणत्या प्रकारच्या कौशल्यांना आम्ही निवड प्रक्रियेमध्ये महत्त्व देतो याबाबतही त्यांनी माहिती दिली.कंपनीमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या संधीं बाबत त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले. कंपनीच्या या दोन्हीही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे मोठे प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.श्रुती काशीद यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. अमित सरकार, अन्य विभाग प्रमुख,अधिष्ठाता,सह अधिष्ठाता ,प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.