राधानगरी दुय्यम निबंधक दिग्विजय आसवले यांचा मानवाधिकार संघटनेतर्फे सत्कार
राधानगरी दुय्यम निबंधक दिग्विजय आसवले यांचा मानवाधिकार संघटनेतर्फे सत्कार

राधानगरी दुय्यम निबंधक दिग्विजय आसवले यांचा मानवाधिकार संघटनेतर्फे सत्कार
-------------------------------------
कुडूत्री(प्रतिनिधी)
---------------------
राधानगरी येथे दुय्यम निबंधक श्रेणी एक या पदी दिग्विजय आसवले यांनी एक महिन्यांपूर्वी कार्यभार स्विकारला असून मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटना यांच्या वतीने त्यांचा कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला.
या पूर्वी दिग्विजय आसवले यांनी पूर्वी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयात त्यांनी वरिष्ठ लिपिक म्हणून काम केले असून ते दौलतवाडी (ता.कागल) गावचे आहेत.
सत्कार कार्यक्रम प्रसंगी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शमशुद्धीन जमादार,मानवाधिकार जिल्हा प्रमुख निवास हुजरे, तालुकाध्यक्ष याकुब बक्षु,पत्रकार सुभाष चौगले,राधानगरी तालुका युवक अध्यक्ष निलेश भोईटे, कार्यालयातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक याकुब बक्षु यांनी केले.