HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'गेम चेंजर'ने घटवली पुष्पाची कमाई ,37 व्या दिवशी फक्त 'इतकी' कमाई

'गेम चेंजर'ने घटवली पुष्पाची कमाई ,37 व्या दिवशी फक्त 'इतकी' कमाई

मुंबई: गेल्या महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या पुष्पा २ सिनेमाच्या कमाईत आता घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. नुकताच बॉक्स ऑफिसवर दाखल झालेला साऊथ स्टारचाच गेम चेंजर आता बॉक्स ऑफिसची गणितं चेंज करणार असं दिसतंय.

आता ३७ दिवसानंतर पुष्पा २ ला गेम चेंजर सिनेमाला टक्कर द्यावी लागत आहे.अर्थात आता गेम चेंजर सिनेमामुळं पुष्पा २ मागे पडणार आहे. गेम चेंजर येताच पुष्पा २ च्या कमाईत मोठी घसरण झाली.३७ दिवसांनंतर पुष्पा २ची १२१३.१५ कोटींची कमाई झाली आहे. ३७ व्या दिवशी पुष्पानं केवळ १ कोटी. १५ लाखांची कमाई केली. ही आतापर्यंतची सगळ्यात कमी कमाई आहे.

२०२५ची सुरुवात राम चरणच्या गेम चेंजरनं झाली आहे. राम चरणच्या या सिनेमाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. तर बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीच्या कामाचंही कौतुक होतंय.

पहिल्या दिवशी तब्बल  ५१. २५ कोटींची कमाई 

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘गेम चेंजर’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ५१. २५ कोटींची कमाई केली आहे. यात तेलुगू भाषेचा वाटा सर्वाधिक आहे. तेलुगू भाषेत या सिनेमानं तब्बल ४२ कोटींची कमाई केली आहे. तामिळ भाषेत सिनेमानं २.१ कोटींची कमाई केली. तर हिंदीत सिनेमानं ७ कोटींची कमाई केली. तर कन्नड आणि मल्याळममध्ये सिनेमाची फार कमाई झाली नाहीये.

आता राम चरणचा गेम चेंजर बॉक्स ऑफिससाठी खरंच गेम चेंजर ठरणार का? हे पाहणं महत्वाचं  ठरणार आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.