HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

दक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी वादाच्या भोवऱ्यात; लैंगिकतेबद्दल केले वादग्रस्त विधान

दक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी वादाच्या भोवऱ्यात; लैंगिकतेबद्दल केले वादग्रस्त विधान

मुंबई : दक्षिण चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी वादात अडकले आहेत. 'ब्रह्म आनंदम' चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात त्यांनी लैंगिकतेबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जातंय. चिरंजीवी हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले. यावेळी त्यांनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी नातू असावा अशी त्यांची इच्छा व्यक्त केली. त्यांनी असंही म्हटलं की, त्यांना भीती आहे की त्यांचा मुलगा राम चरणला पुन्हा मुलगी होऊ शकते.

चिरंजीवीबद्दल लोकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. लोक म्हणत आहेत की, त्यांच्यासारख्या मेगास्टारचं नाव रुपेरी पडद्यावर इतके मोठं असलं तरी त्यांची विचारसरणी खूपच लहान आहे. त्यांच्यावर लिंगभेद म्हणजेच मुलं आणि मुलींमध्ये भेदभाव करण्याचे गंभीर आरोप केले जात आहेत. चिरंजीवी यांनी या कार्यक्रमात असंही म्हटलं की, जेव्हा ते घरी असतात तेव्हा त्यांना त्यांच्या नातवंडांनी वेढलेलं असल्याने ते 'महिला वसतिगृहात' असल्यासारखं वाटतं.

काय म्हणाले चिरंजीवी? 

'ब्रह्म आनंदम'च्या कार्यक्रमात चिरंजीवी म्हणाले, 'जेव्हा मी घरी असतो तेव्हा माझ्या नातवंडांनी वेढलेलं असल्यासारखं वाटत नाही. मला असं वाटतं की, मी महिला हॉस्टेलची वॉर्डन आहे, माझ्याभोवती सर्वत्र महिला आहेत. मला राम चरणकडून अशी अपेक्षा आहे की, किमान यावेळी तरी मुलगा असावा जेणेकरून आपला वारसा चालू राहील, पण त्याची मुलगी त्याचा जीव आहे... मला भीती वाटतं की त्याला पुन्हा मुलगी होईल.'

चिरंजीवीच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

चिरंजीवींच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ट्विटर युजरने व्हिडिओ शेअर केला आणि लिहिलं की, 'चिरंजीवीला भीती आहे की, त्याचा मुलगा राम चरणला दुसरी मुलगी होऊ शकते.' २०२५ मध्ये, पुरुष वारसाबद्दल असा विचार? हे निराशाजनक आहे, पण आश्चर्यकारक नाही. कृपया लक्षात ठेवा - मला एक मुलगी आहे, आणि मी शेकडो लोकांकडून ऐकलं आहे की, मला पुढे मुलगा होईल. ज्या गोष्टी मी करू शकत नाही त्या आपण नियंत्रित कराव्यात असं लोक म्हणतात तेव्हा ते खूप भयानक वाटतं.'

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.