नंदुरबारमधील ही शाळा अफलातून, इथली सर्व मुले...
नंदुरबार : राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता घसरत असल्याची चर्चा कायम आहे. विद्यार्थ्यांना काहीही येत नाही, अशी ओरड सातत्याने केली जाते. पण अशी एक शाळा आहे ज्या शाळेत टॅलेंटची काही कमी नाही.
आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्ये बालआमराई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये अनोखी टॅलेंट पाहायला मिळत आहे. सर्व चिमुकले दोन्ही हातांनी धडे गिरवतात. सर्वच विद्यार्थी चक्क दोन्ही हातांनी पाढे, बाराखडी, इंग्रजी, मराठी शब्द लिहितात. येथील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही लाजवतील असे इंग्रजीचे वाचन करतात, गणितातील ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ अचूक म्हणतात. उलटी उजळणी करण्यात इथले चिमुकल्यांचा झालेला सराव लक्ष वेधून घेतो.
सर्व चिमुकले दोन्ही हातांनी लिहितात
काही वर्षांपूर्वी थ्री इडियट हा चित्रपट आला होता. त्यातील अभिनेता बोमन इराणी यांची व्हायरसची भूमिका मोठ्या प्रमाणावर गाजली. त्यात त्यांनी दोन्ही हातांनी लिहिले होते. त्यावेळी दोन्ही हातांनी लिहू शकतो का असा विचार अनेकांना पडला. मात्र नंदुरबार तालुक्यातील बालआमराई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व चिमुकले दोन्ही हातांनी लिहितात.या शाळेत ३० पटसंख्या आहे. येथील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही लाजवतील असे इंग्रजीचे वाचन करतात, गणितातील ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ अचूक म्हणतात. उलटी उजळणी करण्यात इथले चिमुकल्यांचा झालेला सराव लक्ष वेधून घेतो. यामुळेच कि काय, हि शाळा अनोखी ठरत आहे.