चार वर्षांच्या बी.एस्सी.-बी.एड. एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १६ मार्चपर्यंत मुदत

कोल्हापूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०नुसार शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात बी.एस्सी.-बी.एड. (इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम) या चार वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १६ मार्च २०२५ पर्यंत मुदत आहे.
या चार वर्षाच्या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 ची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण किंवा ज्यांनी बारावी विज्ञान शाखेची परीक्षा नुकतीच दिलेली आहे, असे विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या नॅशनल कॉमन एट्रन्स टेस्ट (NCTE) देण्यासाठी पात्र असून ते सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२५ असून प्रवेश परीक्षा अर्जाची लिंक: https://exams.nta.ac.in/NCTE/ अशी आहे. अधिक माहितीकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील शिक्षणशास्त्र अधिविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले आहे.