रोहितच्या निवृत्तीवर गंभीर स्पष्टच बोलला, जर तुमचा कर्णधार वेगाने फलंदाजी करत असेल तर...

दुबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगला. दुबई आंतरराष्ट्रीच क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला ज्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला. टीम इंडियाचा हा विक्रमी पाचवा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेला आले. त्यानंतर त्याला रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर गंभीरने स्पष्टच उत्तर दिले.
एका पाकिस्तानी पत्रकाराने गंभीरला विचारले की भविष्यात रोहितच्या कारकिर्दीकडे तो कसा पाहतो. यावेळी गंभीर म्हणाला, "मी आत्ता याबद्दल काय बोलू? पण, मी एक गोष्ट सांगेन की जर तुमचा कर्णधार अशा वेगाने फलंदाजी करत असेल तर तो ड्रेसिंग रूमला एक संदेश देतो. तुम्ही एक तज्ञ आणि पत्रकार आहात, तुम्ही धावा आणि सरासरी पाहता. त्या खेळाडूने सामन्यावर काय प्रभाव पाडला आहे ते आपण पाहतो. आपण ज्या प्रकारचे क्रिकेट खेळू इच्छितो त्यासाठी जर कर्णधार पहिला हात वर करत असेल तर त्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही."