डंपरखाली चिरडून पुण्यात दोन बालकांच्यासह तिघांचा मृत्यू

डंपरखाली चिरडून पुण्यात दोन बालकांच्यासह तिघांचा मृत्यू

पुणे : येथील वाघोली चौक - केसनंद फाट्यावर काल मध्यरात्री डंपरखाली चिरडून दोन बालकांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी डंपर चालकास अटक केले आहे. प्रथमदर्शनी डम्परचालक दारूच्या नशेत होता असे पोलिसांना आढळले. चालकास वद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दखल केले आहे. . 

मृतांची नवे अशी - विशाल विनोद पवार, वय 22 वर्ष,

वैभवी रितेश पवार, वय 1 वर्ष, वैभव रितेश पवार, वय 2 वर्ष. जखमी असे - जानकी दिनेश पवार, 21 वर्षे , रिनिशा विनोद पवार, 18 वर्षे, रोशन शशादू भोसले, 9 वर्षे, नागेश निवृत्ती पवार, 27 वर्षे, दर्शन संजय वैराळ, 18 वर्षे, आलिशा विनोद पवार, 47 वर्षे