मिरज ग्रामीण भागातील आरग जुना विजापूर रोड लगत होत असलेल्या बेकायदेशीर मुरूम उत्खननावर कठोर कारवाई करा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
मिरज ग्रामीण भागातील आरग जुना विजापूर रोड लगत शेतजमिनी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक झालेली दिसत आहे तसेच सलगरे बेळंकी व खंडेराजुरी या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन व वाहतूक होत आहे मात्र महसूल प्रशासनानं झोपेचे सोंग घेतलेला आहे व मंडळ अधिकारी यांनी मुरूम माफीयांशी तडजोड केली आहे का? यांच्याच आशीर्वादाने मोठ्या प्रमाणामध्ये मुरूम वाहतूक व उत्खनन केले जात आहे का?अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडवून महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून उत्खनन होत आहे संबंधित शेत जमिनीवर व उत्खनन व वाहतुकीमध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांवरती व अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे येत्या सात दिवसांमध्ये कारवाईस सुरुवात न झाल्यास ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेने दिला आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष स्वप्नील बाबा खांडेकर जिल्हा उपाध्यक्ष अश्रफ शेख, मिरज शहर अध्यक्ष विकी होळकर,किरण सुर्वे,मिलिंद कांबळे,तानाजी जाधव,इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते