HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या सलोनीची युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया' मध्ये निवड

डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या सलोनीची युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया' मध्ये निवड

कोल्हापूर प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयची सिव्हिल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी सलोनी नारायणसिंह राजपूत हीची 'युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया' विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी तिने प्रवेश मिळवला आहे.

'युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया' हे अमेरिकेतील टॉप टेन रँकिंग मधील विद्यापीठ आहे. सलोनीची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन प्रकल्प,शोधनिबंध, पेपर प्रेझेंटेशन आणि नवनवीन तांत्रिक प्रकल्पांवर काम करण्याची क्षमता पाहून त्या विद्यापीठाने तिला उच्च शिक्षणासाठी प्रवेश दिला आहे.

सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम सत्र परीक्षेत सलोनी GPA 9.1/10 गुण मिळवले असून दोन विषयांमध्ये शंभर पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. या महाविद्यालयात संशोधनाबाबत मिळालेले प्रोत्साहन आणि उत्कृष्ट प्रकल्पांचे यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठीचे मार्गदर्शन यामुळे 'युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया' सारख्या आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या विद्यापीठात सिविल इंजिनिअरिंग क्षेत्रातील कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटसाठी प्रवेश मिळवता आला याचा मला अभिमान असल्याचे सलोनीने सांगितले. 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी सलोनी व तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे. सलोनीचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अमेरिकेतील उच्च शिक्षणानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात ती निश्चितच चांगले योगदान देईल असा विश्वास डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांनीही तिला शुभेच्छा दिल्या.

सलोनीच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. किरण माने यांनी अभिनंदन केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.