निर्भया पथक महिलांचा आत्मविश्वास वाढविणारे ... - मंत्री हसन मुश्रीफ

निर्भया पथक महिलांचा आत्मविश्वास वाढविणारे ... -  मंत्री हसन मुश्रीफ

बाचणी - पोलीस दलातील निर्भया पथक मुली आणि महिलांचा आत्मविश्वास वाढविणारे आहे. मुली आणि महिलांनीही आत्मसंरक्षणासाठी सिद्ध व्हावे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. मुली आणि महिलांनी आता काळाच्या मागे राहून चालणार नाही. निर्भया पथकाच्या प्रात्यक्षिकांमुळे कोणत्याही संकटाच्या प्रसंगाला मुली आणि महिला खंबीरपणे तोंड देतील. मुलींनी विद्यार्थी दशेपासूनच स्वसंरक्षणासाठी धडे घेऊन समाजविघातक अपप्रवृत्तींना ठोकलं पाहिजे, असेही ते म्हणाले.

         

बाचणी ता. कागल येथे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस व नाम.  हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्या वतीने “सक्षम तू.....” या विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

शिबिरात गावातील न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेबवडे भाग हायस्कूल, साई दिशा ॲकॅडमी, सान्त ॲना इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यामंदिर बाचणी, गुरुकुल अकॅडमी, ज्ञान प्रबोधिनी स्कूल या शाळांच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

शिबिरामध्ये महिलांच्या सुरक्षितता, सक्षमीकरण व कायदेशीर हक्क याविषयी माहिती देण्यात आली.  कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी “निर्भया पथक” या महत्त्वपूर्ण उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी महिलांनी संकटावेळी काय करावे, कायदेशीर मदत कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले.

खुद से जीत........!

भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून "खुद से जीत...." या अभियानांतर्गत महिलांमधील गर्भाशयाच्या कॅन्सरमुक्तीचे लसीकरण तसेच; पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मा वाटप मोहीम हाती घेतली आहे. सर्वच शाळांमधील शिक्षक आणि पालकांनी सतर्क राहून विद्यार्थ्यांची तपासणी करून घ्यावी, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाला करवीर निर्भया पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पाटील, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील, संचालक सुयोग वाडकर, कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शितल फराकटे, कागल पंचायत समितीचे सभापती जयदीप पोवार, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक प्रकाश पाटील, केंबळीचे सरपंच विकास पाटील, बाचणीचे माजी सरपंच इकबाल नायकवडी, बाचणीचे माजी उपसरपंच पांडुरंग पाटील, एम. एस. खामकर, साई दिक्षा अकॅडमीचे प्रा. अजित पाटील, गुरुकुल अकॅडमीच्या मुख्याध्यापिका रुपाली सडोलकर, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संचालक दिनकर जाधव, न्यू हायस्कूल मुख्याध्यापक ए. आर. खामकर, साई दिशा अकॅडमीच्या प्राचार्या अरुणा पाटील, शामराव तिरुके, बाबुराव पाटील, पिटर डिसोझा, पदाधिकारी, अनेक महिला प्रतिनिधी, विद्यार्थी - विद्यार्थिंनी व विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकट उपस्थित होते.