न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

नारायण लोहार / सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर या विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. इयत्ता 5 वी ते 10 वीच्या सर्व विद्यार्थिनींनी वर्गवार राख्या बांधल्या. विद्यार्थ्यांनी बहिणीला ओवाळणी म्हणून बहिणीस भेटवस्तू दिल्या. बहिणीनी भावास जिलेबीचा खाऊ दिला. तसेच नारळाच्या झाडाला राखी बांधून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.

रक्षाबंधनाचे महत्व विद्यालयातील शिक्षक नारायण लोहार सर व समिर नाईक सर यांनी विशद केले. इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थिंनींनी रक्षाबंधनाचे गीत सादर केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. शेवाळकर, नारायण लोहार सर, समिर नाईक सर अदिती ढवळे मॅडम, अनुष्का मार्गी मॅडम, श्रृती वारंग मॅडम, प्रमोद सावंत व प्रफुल्लता सावंत हे उपस्थित होते.