जिल्हा परिषदेच्या कामाकाजाबाबत विभागीय आयुक्त समाधानी

जिल्हा परिषदेच्या कामाकाजाबाबत विभागीय आयुक्त समाधानी

 कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अहवाल वाचनाकरीता विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज गुरुवारी 5 डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्या वेळी जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलला भेट देऊन शाळेची इमारत पाहणी करुन माहिती घेतली. त्यांनतर जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील कागलकर हाऊसची पहाणी करुन माहिती घेतली व त्या ठिकाणी असलेल्या बचत गटांचे स्टॉलला भेट दिली आणि बचत गटांच्या विविध उत्पादनांची खरेदी केली. जिल्हा परिषदेच्या एकूण कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

    यावेळी अहवाल वाचनावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी प्रास्ताविक केले व जिल्हा परिषदेची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी जिल्हा परिषदेने सुरु केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व घेणेत येणारे उपक्रम याची विभानिहाय माहिती दिली. 

   अहवालील मुददे वाचनावेळी विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची मुले शिकतात याबददल समाधान व्यक्त केले शिक्षकांनी शाळेतील मुलांना ‍स्वत:ची मुले समजून शिकवले तर याचे पुढच्या पिढीमध्ये सकारात्म दिसतील असे सूचित केले. तसेच शाळेतील मुलांची संभाषण कला वाढावी याकरीता विशेष अभियान राबवावे, कायाकल्प योजना, आदर्श शाळा यासारख्या दिशा दर्शक योजना राज्याला कोल्हापूरने दिल्या आहेत, अश्याच नव-नवीन योजना जिल्हा परिषदेकडून यापुढेही केल्या जातील असा विश्वास व्यक्त केला.

    त्याचप्रमाणे ग्रामिण भागात व शहरी भागात कुठेही कचरा, प्लॅस्टीक दिसणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या व नागरीकांनी असा कचरा दिसलेस त्याचे फोटे काढून संबंधित ग्राम पंचायत व गट विकास अधिकारी यांचेकडे तक्रार करावी आणि याची सुरुवात कोल्हापूर जिल्हयातून करावी असे सूचीत केले याकरीता आवश्यकता असल्यास दंडही करावा असे निर्देश दिले. 

 ग्राम पंचायतीच्या वैधानीक कामकाजावर गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण असणे आवश्यक आहे यासाठी गट विकास अधिकारी यांनी ग्राम पंचायतीना प्रत्यक्षात भेटी दयाव्यात. तसेच आर्थिक नियमांचे उल्लंघन झालेस कारवाईबाबत आग्रही रहावे अशा सूचना दिल्या.

 आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाकडील मुदयांचा आढावा घेतांना सरळसेवा भरती प्रक्रियेत पुणे विभागात चांगले कामकाज केलेबददल अभिनंदन केले तसेच जिल्हा परिषदेच्या एकंदरीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन जिल्हा परिषद कोल्हापूर ही देशाला दिशादिर्शक होईल असे कामकाज करु शकते असा अविश्वास व्यक्त केला.           

 कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी हे शासनाच्या योजाना राबविण्याबाबत सकारात्मक असल्याने त्याचा परिणाम जिल्हा परिषदेचे एकूणच कामकाज उत्कृष्ट असण्यावर झाला आहे असे अभिप्राय त्यांनी नोंदविले.

 अहवाल वाचन झालेवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी आभार व्यक्त केले. अहवाल वाचनाकरीता नितीन माने, उपायुक्त (आस्थापना) पुणे, अजय जोशी, सहा. आयुक्त चौकशी पुणे, सुषमा देसाई, प्रकल्प संचालक, सर्व खाते प्रमुख व गट विकास अधिकारी ऊपस्थित होते.