अशोकराव माने इन्स्टिट्यूटच्या २८७ विद्यार्थ्यांची निवड - विजयसिंह माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) - श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या (स्वायत्त महाविद्यालय) अंतिम वर्षातील २८७ विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झाली आहे. यामध्ये आयटी कंपन्यांसह कोअर कंपन्यांचाही समावेश आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या या महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना अॅप्टीट्यूड, साॅफ्टस्कील, कोडिंग व मुलाखतीसंबंधी ३५० तासांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. महाविद्यालयाने विविध कंपन्या, प्रशिक्षण संस्थांशी सामंजस्य करार केल्याने प्लेसमेंटच्या अधिकाधिक संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होत आहेत."
यावेळी उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी म्हणाले, "नुकताच महाविद्यालयास स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असून प्लेसमेंटचा हा चढता आलेख महाविद्यालयाच्या यशस्वितेचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी महाविद्यालयाने आयोजित केलेले विविध कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह, विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम तसेच इंटरव्ह्यूसाठी केलेले मार्गदर्शन कारणीभूत आहे. विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच ॲप्टीट्यूडचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांना मुलाखत प्रक्रीया, गटचर्चा, बायोडाटा तयार करणे यांचे प्रशिक्षण 'प्लेसमेंट रेडीनेस प्रोग्रॅम'द्वारे देण्यात येते."
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, मायक्रो लँड, न्यूमेट्री टेक्नॉलॉजी, असेंचर, एक्साइड इंडस्ट्रीज, फुरेशिया, सुजलोन, अदानी सिमेंट, टाटा ऑटो कंपोनंट, सॅंकी सोल्युशन्स, भारत फोर्ज, इन्फोविजन, एवर इलेक्ट्रॉनिक्स, एलकॉम इंटरनॅशनल, स्ट्रीबो, अल्ट्रा फायरटेक सिस्टीम, कोलब्रो ग्रुप, मॅजिक स्टोन, कला ग्रुप, इंडोवन्स, कीमल ग्रुप, झेड एफ स्टेरिंग गिअर, आर स्क्वेअर सॉफ्ट टेक्नॉलॉजी, सीपीएस प्रा. लि., देसाई इलेक्ट्रॉनिक्स, सुरज बिल्डकॉन, एस आर कुलकर्णी डेव्हलपर्स यांसारख्या विविध नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांना या कंपन्यांतर्फे ३.२ लाखांपासून ते १२.५ लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे. तसेच १७ विद्यार्थ्यांची दोन कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
औद्योगिक क्षेत्राला अभिप्रेत असणारे प्रकल्प आधारित शिक्षण, ट्रेनिंग प्रोग्रॅम्स, इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष अनुभव, मुलाखतीची तयारी याचा उपयोग प्लेसमेंटसाठी होत असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
कॅम्पस प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, जि.प. माजी सदस्या मनिषा माने, इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी, ट्रेनिंग-प्लेसमेंट ऑफीसर प्रा. अविनाश उथळे, प्रा. अमोल पाटील आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन तसेच सर्व विभागप्रमुख, सर्व विभागीय ट्रेनिंग-प्लेसमेंट ऑफीसर यांचे सहकार्य लाभले.
निवडक यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे -
गौरव गोदाने - मायक्रो लँड (१२.५ लाख), श्रीया वायंगणकर - साई ऑटो इलेक्ट्रॉनिक्स (५.५ लाख), स्मिताली येरुडकर - न्युमेट्री टेक्नॉलॉजी (४ लाख), अनुराधा फरकटे - टीसीएस (३.५ लाख), प्रेम कांबळे - अदानी सिमेंट (३.५ लाख), मृणालिनी बर्गे - देसाई इलेक्ट्रॉनिक्स (३.५ लाख), आदर्श खुपरकर - सुरज बिल्डकॉन (३.५ लाख), प्रीतम चव्हाण - कला ग्रुप (३.५ लाख)
औद्योगिक क्षेत्रातील सध्याची गरज ओळखून महाविद्यालयाने स्किल डेव्हलपमेंट हा स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये एज्युस्किल्स, इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड, सिस्को नेटवर्किंग अकॅडमी, आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना यासारख्या माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण व प्रमाणपत्र दिले जात आहे.