पंजाबी गायक प्रेम ढिल्लो यांच्या कॅनडामधील घरावर गोळीबार
मुंबई:पंजाबी गायक प्रेम ढिल्लो यांच्या कॅनडामधील घरावर गोळीबार झाला. गेल्या वर्षी गायक ए. पी.ढिल्लोच्या याच्याही कॅनडा इथल्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळं पुन्हा एकदा म्युझिक इंडस्ट्री हादरली आहे.
पंजाबी गायक प्रेम ढिल्लो याचा कॅनडात बंगला आहे. बंगल्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारामागे जयपाल भुल्लर टोळीचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. घरावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर आहे.