‘फुले’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात ,खासदार संजय राऊत म्हणाले...

‘फुले’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात ,खासदार संजय राऊत म्हणाले...

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : बहुचर्चित चित्रपट  ‘फुले’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महात्मा फुले जयंतीला प्रदर्शित होणार असलेला हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला. आता ‘फुले’ सिनेमा 11 एप्रिल रोजी नाही तर, 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमावर आता राजकीय व्यक्ती देखील स्वतःची भूमिका मांडताना दिसत आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘फुले’ सिनेमावर स्वतःचं मत मांडलं आहे. सर्वत्र संजय राऊत यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

संजय राऊत या चित्रपटाबाबत भूमिका मांडताना म्हणाले ,‘आमच्या पक्षाची एक भूमिका आहे. कालच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे. महात्मा ज्योतिबा फुले देशाचे एक असे महात्मा होते, ज्यांनी देशाच्या सामाजिक सुधारणेसाठी पुढाकार घेतला.’ ‘महिलांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी असंख्य संकटांचा सामना फुले यांनी केला. आता सिनेमात जे काही दाखवलं आहे, ते खोटं तर नाहीये… तेव्हा जे काही झालं होतं ते सर्व रेकॉर्डमध्ये आहे. महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलं यांच्यावर जे वाड़्मय प्रसिद्ध केलं आहेत. त्यामध्ये सर्वकाही आहे. सरकारी पुस्तकांमध्ये सर्वकाही आहे. तेच सिनेमात दाखवलं आहे. तर सेन्सॉर बोर्ड येथे कुठून आलं?’ असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

... तर म्हणतील ही मुर्खता 

‘सरकारने सिनेमाच्या बाजूने उभं राहायला हवं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिनेमाची बाजू घ्यायला हवी. ज्योतिबांचा बचाव केला पाहिजे… मी असं म्हणालो तर म्हणतील ही मुर्खता आहे. फुलेंच्या विचारांची रक्षा करायला हवी. मी असं म्हणालो तर, ते त्यांना आवडणार नाही. कारण ते एका विचारसणीची लोकं आहेत जी सत्तेत आहेत. ‘फुले’ सिनेमातील काही सीन आम्ही पाहिले आहेत आणि जे सत्य आहे तेच सिनेमात दाखवण्यात आलं आहे.’ असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.