भागीरथी महिला संस्था आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभ संपन्न

भागीरथी महिला संस्था आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभ संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  चौथ्या श्रावण सोमवार निमित्त, भागीरथी महिला संस्था आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने कसबा बावडा येथे हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला कसबा बावडा परिसरातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतीला विजयी करा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. तर स्त्री शक्तीला साद घालत, नवं नेतृत्व करण्यासाठी आपण तयार असल्याचे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी जाहीर केले.

 महिला सक्षमीकरणाचे व्रत घेवून भागीरथी महिला संस्था गेली १५ वर्षे कार्यरत आहे. आजवर अरूंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली बचत गटांच्या माध्यमातून ३५ हजार पेक्षा अधिक महिला या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. आज चौथ्या श्रावण सोमवारचे निमित्त साधून, कसबा बावडा इथल्या उलपे हॉल मध्ये हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भागीरथी महिला संस्था आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पॉट गेमसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी अरूंधती महाडिक यांनी कार्यक्रमाचा हेतु सांगितला. भागीरथी संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या स्त्री सक्षमीकरण चळवळीत प्रत्येकाने सक्रीय व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. खासदार धनंजय महाडिक यांनीही भागीरथी संस्थेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर विरोधक नाहक टिका करत आहेत. या योजनेला मिळणार्‍या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, असे त्यांनी नमुद केले. बदलापूर मध्ये झालेली घटना निंदनीय आहे. मात्र विरोधक त्याचेही राजकारण करत असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  कसबा बावड्यातून होणार्‍या नकारात्मक राजकारणावरही खासदार महाडिक यांनी भाष्य केले. केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे असे सांगत, येत्या विधानसभा निवडणूकीत त्यांच्या हाती फारसे काही लागणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान कृष्णराज महाडिक यांचेही यावेळी भाषण झाले. स्त्री शक्तीला साद घालत नवं नेतृत्व करण्यासाठी आपण तयार असल्याचे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी जाहीर केले. 

यावेळी उद्योग निरीक्षक शितल माळी, सचिन पाटणकर यांनी राज्य शासनाच्या महिलांविषयक उद्योग- व्यवसाय योजनांची माहिती दिली. भागीरथी संस्थेच्या सहकार्यातून महिलांनी आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन शितल माळी यांनी केले. तर सचिन पानारी यांनीही महिलांना उदयोग- व्यवसायासाठी मार्गदर्शन केले. दरम्यान भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्यासमवेत महिलांनी अनेक स्पॉट गेम कार्यक्रमाचा आनंद लुटला. या हळदी - कुंकू कार्यक्रमात जलसंपदा विभागात निवड झालेल्या रणजित पाटोळे यांचा विशेष सत्कार अरूंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच स्पॉट गेममधील विजेत्या महिलांना. महाडिक यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप उलपे, नारायण चव्हाण, चंद्रकांत घाटगे, प्रदिप उलपे, उमा उलपे, धिरज उलपे उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रूपाली कुंभार, आशा बेडेकर, संगीता खाडे, शारदा पोटे, संपदा उलपे, अश्‍विनी पंडत, हेमलता शिंदे, राजश्री उलपे, शरयू बेडेकर, सेजल शेडगे, ओंकार जगताप, साक्षी बेडेकर, सुवर्णा बेडेकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रज्ञा उलपे, प्रियांका उलपे, सुवर्णा पाटील, अरूणा घाटगे, अमर साठे, किशोर पवार, कोमल साठे, जयश्री पाटोळे, मनिषा साळोखे, सोनाली मगदूम यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.