माध्यमिक वेतन पथक कार्यालयातून सादर केलेली बिले गायब*

माध्यमिक वेतन पथक कार्यालयातून सादर केलेली बिले गायब*

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ*

सांगली जिल्हा माध्यमिक वेतन पथक सांगली या कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आज महावीर सौंदत्ते सर मुख्य सचिव निवृत्त रयत सेवक संघ सांगली, बहुजन कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजयकुमार कांबळे, शिक्षक भारती संघटनेचे संजय पवार,सुरेश संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आज वेतन पथक कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या प्रस्ताव फायली सापडत नसल्याची दिसून आले. काही कर्मचाऱ्यांनी दोन दोन तीन तीन वेळा प्रस्ताव फाईली दाखल केलेल्या असतानाही त्या पाहिली या कार्यालयात सापडत नसल्याचे आढलुन आले अशा जिल्ह्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तक्रारी आमच्या संघटनांकडे आलेल्या आहेत. या बाबत कार्यालयीन प्रमुख व वेतन पथक अधीक्षक यांनी गांभीर्याने विचार करणेचे गरजेचे असताना जाणीवपूर्वक आज कार्यालयात येण्यास टाळले का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या थकीत बिले, वैद्यकीय बिले, सेवानिवृत्ती दुसरा, तिसरा हप्ता, अर्जित रजेचे रोखीकरण, अशी अनेक देयके सापडत नसल्याचे निदर्शनात आले. ब्रम्हनाळ हायस्कूलचे हेमंत यमगर यांच्या विद्यालयातील शिक्षकांचे थकीत वेतन बिल गेली तीन वर्षे पेंडिंग असून अद्याप त्याबाबत योग्य निर्णय झालेला नाही . जर योग्य निर्णय न घेतल्यास त्यांनी एक मे रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. पण काही संघटनेचे पदाधिकारी यांची बिले मात्र 28 मार्च रोजी अदा करण्यात आलेले आहेत. असे काही प्रस्ताव समोर आलेले आहेत याबाबत माननीय शिक्षणाधिकारी उपसंचालक यांना निवेदन देण्यात येनार आहे . व पुढील काळात 31मे किंवा 1 जून रोजी मा. शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. दिलेला प्रस्ताव गहाळ होणे हे कार्यालयाच्या दृष्टीने गंभीर बाब असून याबाबत माननीय शिक्षणाधिकारी व उपसंचालक कोल्हापूर यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पण त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही का? असा मात्र प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत मे मध्ये किंवा मे च्या सुरुवातीस वेतन पथक अधीक्षक व शिक्षण अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे. जर या कार्यालयामध्ये सुधारणा झाली नाही किंवा होत नसेल तर या विरोधामध्ये मे च्या शेवटच्या आठवड्यात सांगली शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यासमोर वेतन पदक अधीक्षक यांची बदली करावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा संघटनांनी दिला. या बैठकीत शाहीर पाटील, संतोष चौगुले, काकासाहेब साबळे, राजोबा सर, सुचिता पाटील, विजया देशमाने, निर्मला वाडकर, सुनीता शिंगाडे, मंदाकिनी सावंत, गणपती आंबी, प्रदीप मगदूम, कांबळे एस एम, भूपाल शिरोटे, पी के चौगुले, इत्यादी हजर होते.