न्यू इंग्लिश स्कूल सोनी विद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल सोनी विद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल सोनी विद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

न्यू इंग्लिश स्कूल सोनी विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरजचे अध्यक्ष श्री मिलिंद जाधव सर तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष श्री अविनाश जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री अंकुश हजारे सर श्री लालासो पाटील धुळगाव समाजसेवक, शाळेची माजी मुख्याध्यापक श्री व्ही एम साळुंखे सर या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.या विविध गुणदर्शन कार्यक्रमात तनिष्का कांबळे ,समृद्धी गोखले, दामिनी बनसोडे, मूनताह देवर्षी ,पृथ्वीराज नरुटे , रसिका हजारे ,निसर्गा हजारे,  आनम मुल्ला, असीन मुजावर यांच्यासह पंधरा विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

विद्यालयातील या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सदाबहार कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थिती पालक वर्ग या सर्वांचे शाळेचे मुख्याध्यापक वन मोरे सर यांनी बुके देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन श्री अशोक मासाळ सर यांनी केले तर प्रास्ताविक श्री नरोटे सर यांनी केले आभार सौ पाटील मॅडम यांनी केलेया कार्यक्रमास विद्यार्थी पालक व मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच विद्यालयाचे शिक्षक स्वप्निल पाटील अमोल घोरपडे पल्लवी वनमोरे राहुल जाधव उपस्थित होते.अशा रीतीने संस्कृतीकरण मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला.