पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव दिन गुंडेवाडी साजरा

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
राण्या असंख्य झाल्या या जगात पुण्यश्लोक कोणी नाही गर्व जिचा आहे धनगर हृदयाला एकच ती महाराणी अहिल्याबाई होळकर झाली.
जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपूर्ण शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडलं 31 मे 1725 रोजी माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली या कन्येच्या तेजाने साक्षात सूर्य ही लाजला या कण्याचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले. ही तिच महिला जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचे तंत्र या हिंदुस्तानाच्या मातीत राबविलं ही तीच आहिल्या जिने चूल आणि मूल समाज व्यवस्थेला झुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला.
युद्धात पतीचे निधन वृद्धापकाळाने सासर्याचे निधन स्वतःच्या पुत्राचे अकाली निधन होऊन देखील राजमाता अहिल्यादेवी ने राजकारभार वर आपली पकड घट्ट ठेवली होती कौटुंबिक दुःखामुळे हतबल न होता. आपली प्रजा हेच आपले कुटुंब समजून अतिशय धैर्याने त्यांनी होळकर साम्राज्याला आदर्श राज्य ठरवले राजमाता अहिल्यादेवी ह्या त्यामुळे अलौकिक राजकर्त्या ठरतात.
भारतातील धर्म स्थळांचा जार्णोद्धार जितका अहिल्यादेवी ने केला तितका अन्य संस्थानिकांना जमला नाही. यासाठी आजही आपणासाठी राजमाता अहिल्यादेवी आदर्शवत आहेत.
अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन माननीय सरपंच भाऊसो पाटील व भास्कर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित उपसरपंच श्रीमंत पांढरे रमेश सुबराव पाटील आनंदा पाटील ग्रा.प. सदस्य, आनंदा पाटील ग्रा प सदस्य, आबा शिनगारे बाबासो सरक मनू पाटील अशोक मासाळ , अहिल्या मंडळाचे अध्यक्ष दरगोंडा पाटील, हर्षद पाटील आनंदा पाटील सुखदेव पाटील ऋषिकेश कटारे पांडुरंग पाटील शुभम पाटील गणेश पाटील गणेश पांढरे संदेश पाटील तसेच गुंडेवाडी गावचे समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.