मेरठ हादरले : एकाच कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या

मेरठ हादरले : एकाच कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : एकाच कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे ही घटना घडली आहे. 

घरात पती-पत्नीचे मृतदेह चादरीत गुंडाळलेले आढळले. त्यांच्या तीन मुलींना मारून पोत्यात भरून, नंतर बेड बॉक्समध्ये ठेवले होते.

सर्वांच्या डोक्यावर खोल जखमा आहेत. मानेवर धारदार शस्त्राच्या खुणाही आढळून आल्या. घराचे गेट बाहेरून बंद होते. सकाळपासून नातेवाईक आणि भाऊ फोन करत होते, मात्र फोन येत नव्हते. शेजाऱ्यांनीही एक दिवस कुटुंबाला पाहिले नव्हते. उतर प्रदेशातील मेरठमधील लिसाडी गेट परिसरातील सोहेल गार्डनमध्ये हा प्रकार घडला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पती मोईन, पत्नी अस्मा आणि 3 मुली – अफसा (8), अजीजा (4) आणि अदीबा (1) यांचा समावेश आहे.

भावासह डॉक्टरही रडारवर 

मोईन हा मेकॅनिक म्हणून काम करत होता, अस्मा त्याची तिसरी पत्नी होती. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घराची झडती घेतली. एडीजी डीके ठाकूर आणि डीआयजी कलानिधी नैथानीही पोहोचले. प्राथमिक तपासात मोईनच्या भावावर हत्येचा संशय आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एक डॉक्टरही रडारवर आहे.

मोईन हा भाड्याच्या घरात राहत होता. दरवाजा तोडून भाऊ आत पोहोचला. कपडे आणि सामान जमिनीवर विखुरले होते. दारासमोरच एक खोली होती, जवळच एक छोटेसे स्वयंपाकघर होते. खोलीतील जमिनीवर, बेडजवळ, मोईन आणि त्याच्या पत्नीचे मृतदेह, चादरीमध्ये होते. धारदार शस्त्रांनी त्यांचा गळा चिरला होता. जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता. मुलींचे मृतदेह बेडच्या आत लपवून ठेवले होते. हे मृतदेह पोत्यात होते. आतमध्ये रक्ताचा सडा होता.